rahesh kolhal supporters morcha at hingoli collector office saam tv
महाराष्ट्र

Hingoli : कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांच्या मारेक-यांना अटक करा, हिंगाेली जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांचा माेर्चा

Hingoli Latest Marathi News : हिंगाेलीत खूनाची घटना पाच दिवसांपूर्वी घडून देखील संशयित आराेपी अद्याप माेकाट फिरत असल्याचा आराेप ग्रामस्थ करु लागले आहेत.

संदीप नागरे

Hingoli

कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांच्या मारेक-यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आज (मंगळवार) काेल्हाळ यांच्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत हिंगाेली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (morcha at hingoli collector office) काढला. या माेर्चात राजेश कोल्हाळ यांच्या पत्नी देखील सहभागी झाल्या हाेत्या. या आंदाेलनाप्रसंगी त्यांना अश्रू अनावर झाले होते. (Maharashtra News)

हिंगोली जिल्ह्यातील बाळापुरमध्ये कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा खून झाला हाेता. हा खून मजुराने केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली हाेती. ही घटना पाच दिवसांपूर्वी घडून देखील संशयित आराेपी अद्याप माेकाट फिरत असल्याचा आराेप ग्रामस्थ करु लागले आहेत.

या प्रकरणात खून केलेल्या संशयित आरोपीस पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसल्याने काेल्हाळ यांच्या गावातील लाेक आक्रमक झाले. त्यांनी आज थेट हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देत तात्काळ आराेपीला अटक करा अशी मागणी केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT