BJP MLC Vivek Kolhe addresses supporters during a grand felicitation event in Rahata, amid rising political tensions with Radhakrishna Vikhe Patil. saam tv
महाराष्ट्र

अडथळे आणू नका, संयमाला मर्यादा असते, जब भी मै घायल होता हुं, तब मै घातक होता हुं, भाजप आमदाराचा विखे पाटलांवर निशाणा

Vivek Kolhe Statement Against Vikhe Patil In Rahata: अहिल्यानगरमध्ये आमदार विवेक कोल्हे यांच्या सत्कार सोहळ्यातून भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर आला. विखे पाटलांवर कोल्हेंचा अप्रत्यक्ष निशाणा, तर महाविकास आघाडीचे नेतेही कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.. त्याचाच प्रत्यय, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात आयोजित कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या दरम्यान आलाय. या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

भाजपचे कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्ष अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याला परिचित आहे. त्यातच विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच पक्षांमधील विखे विरोधक चांगलेच सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. काल विखे पाटलांच्या राहाता तालुक्यात भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी भाजपमधील विखे विरोधकांसह महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रभावती घोगरे यांनी तर विवेक कोल्हे यांच्या आमदारकीमुळे आम्हाला ऑक्सिजन मिळाल्याचं म्हंटलय.. मी काँग्रेसची पदाधिकारी असले तरी कोल्हे यांच्या सत्कारासाठी उपस्थित आहे. "पक्ष जरी तुमचा, तरी माणूस आमचा" असं म्हणतं घोगरे यांनी विखे पाटलांना डीवचण्याचा प्रयत्न केला..

विवेक कोल्हे यांनी देखील आपल्या भाषणात उपस्थित सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांचे आभार मानत गणेश कारखाना कर्ज प्रकरणावरून विखे पाटलांना लक्ष केले. तीन वर्षांनी पुन्हा कारखाना निवडणुका होतील, त्यावेळी लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा. मात्र कर्ज प्रकरणात अडथळे आणून या परिसरातील शेतकऱ्यांची कामधेनु अडचणीत आणू नका. संयमाला मर्यादा असते, आमचं कुणाशी बांधावरून भांडण नाही. मात्र, संस्थेसाठी मूळ स्वभावाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची देखील तयारी आहे. "जब भी मै घायल होता हुं, तब मैं घातक होता हुं" हे विरोधकांनी लक्षात ठेवावं.

आमदारकीचा बिल्ला मुख्यमंत्र्यांनी माझ्या छातीवर लावलाय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे काही काम नाही. आता माझे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून त्यात राहाता आणि लोणी देखील येतं. वेळप्रसंगी जनतेच्या कामांसाठी कमीपणा घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे जाण्याची तयारी आहे. मात्र जाणीवपूर्व कुणाला अडचणी निर्माण केल्या जात असतील तर मी एक भाऊ म्हणून कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची दानत ठेवतो, असं आमदार विवेक कोल्हे यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंधन टंचाईची अफवा करून हळदीचे लिलाव बंद करणाऱ्या हिंगोलीच्या बाजार समितीला जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

BJP Reshuffle: भाजपमध्ये मोठा फेरबदल, थेट ४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

Riteish-Raja Shivaji Collection: रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; २७ व्या दिवशीही केलं छप्परफाड कलेक्शन

औषधं न घेता डायबिटीज होईल बरा! स्वयंपाकघरातील 'हे' ३ मसाले रक्तातील साखर करतील कमी

Shocking : घरात कोणीही नसताना सैतान जागा झाला, तोंड,हात बांधून भावाकडून बहिणीवर बलात्कार

SCROLL FOR NEXT