Radhakrishna Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : सत्यजित तांबेंना धोका काँग्रेसने की मामाने दिला? विखे पाटलांनी केला खडा सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशिल थोरात

Radhakrishna Vikhe Patil News : नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याबाबत सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला की त्यांच्या मामांनी याचा खुलासा करावं अशी टीका त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या होणार आहे. बाळा साहेबांसारखे थोर व्यक्तिमत्त्वाच्या तैल चित्राच्या अनावरण प्रसंगी शिवसेनेने राजकारण करण्यापेक्षा उपस्थित राहणे महत्त्वाचे होते मात्र त्यांना उपस्थित न राहण्याची दुर्बुद्धी कुणी दिली असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

तसेच शिवसेनेने (Shivsena) भाजप (BJP) बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये आमदार, खासदार निवडून आणल्यानंतर गद्दारी करून महाभकास आघाडी केली होती. त्यामुळे गद्दारी कोणी कोणाबरोबर केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांमध्ये महाविकास आघाडी मध्ये बरेच भविष्यकार तयार झाले असून रोज भविष्यवाणी करत आहेत. पूर्वी रस्त्याच्या कडेला बसून पोपटाला घेऊन बसणारे चिठ्ठी द्वारे भविष्य काढायचे आता महाविकास आघाडीचे पोपटपंची जे झालेले आहेत त्यांना माझा सल्ला आहे की, आता हे बंद करा तुम्हाला कोणीही दाना टाकणार नाही. तुम्ही जितक्या वेळा भविष्यवाणी करणार आहात तितका कालावधी सरकारचा वाढणार आहे असे देखील विखे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT