Radhakrishna vikhe patil: Saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil: 'नाचता येईना अंगण वाकडे'; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार

Radhakrishna vikhe patil: 'नाचता येईना अंगण वाकडे', अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Radhakrishna vikhe Patil News:

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे अहमदनगरच्या संगमनेर शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी शासकीय विश्रामगृहावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'नाचता येईना अंगण वाकडे', अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर वक्तव्य केलं होतं. बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'नाचता येईना अंगण वाकडे , अशी बाळासाहेब थोरात यांची परिस्थिती आहे. त्यांनी दिवंगत बाळासाहेब विखे यांच्यावर टीका केली याचा प्रथम निषेध करतो. त्यांनी किती पक्षसंघटन धरून काम केलं हे लोकांनी पाहिलंय'.

'त्यांचे मेव्हणे लोकसभेला उभे असताना तुम्ही कोणाला मतदान केलं हे सर्वांना माहीत आहे. मलाही तुमच्या वडिलांवर खूप बोलता येईल. संघर्ष आपला आहे. जुन्या लोकांमध्ये घेऊन आपलं अपयश झाकू नका, अशा शब्दात विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

मंत्री विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं. ' दुर्दैवाने काही मंडळी आरक्षणाबाबत वेगळी वक्तव्य करत आहेत. आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, ज्या काँग्रेसचं अशोक चव्हाण नेतृत्व करतात, त्या पक्षात तरी एकमत आहे का ? असा सवाल करत मंत्री विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.

'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेते वेगळी भूमिका मांडतात. अशोक चव्हाण वेगळं बोलतात. आधी काँग्रेसच्या नेत्यांनी अजेंडा ठरवावा नेमक काय करायचं. तीच परिस्थिती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. शरद पवार हे अजून स्पष्ट मांडत नाही तर उद्धव ठाकरे याबद्दल तर बोलतच नाही. आमचं महायुती सरकारची भूमिका आरक्षण देण्याची आहे व तीच कायम राहील, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

अवकाळी पावसाच्या नुकसानीवर विखे पाटील काय म्हणाले?

'नगर जिल्ह्यातील 69 महसूल मंडळात आपण दुष्काळ जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत सरकार कायम जनतेच्या पाठीशी आहे. जिथे कुठे अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालं असेल तर पंचनामे करून मदत दिली जाईल, असं आश्वासन विखे पाटील यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

SCROLL FOR NEXT