शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारं हे विधानं आहे... जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाचं....एकीकडे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारून आक्रोशाला वाट मोकळी करून दिलीय... अशातच दुसरीकडे सत्ताधाऱी नेत्यांची कर्जमाफीवरून बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच आहे....यात आता भर पडलीय... विखे पाटलाच्या वादग्रस्त विधानाची.... विखे पाटील नेमकं काय म्हणालेत पुन्हा एकदा ऐका...
दरम्यान उद्धव ठाकरेंनी विखे पाटलांच्या याचं विधानावरून घणाघाती टीका केलीय..विखे पाटलांचे घोटाळे जगजाहीर आहेत. त्यांच्या कारखान्याची किती वेळा कर्जमाफी झाली, असा सवालच ठाकरेंनी उपस्थित केलाय...
खरंतर राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय. त्याला आधार देण्यासाठी सरकारने 32 हजार 628 कोटी रुपये मंजूर केले आहेत... मात्र ही फक्त तात्पुरती मदत आहे.. त्यामुळे बळीराजाला वाचवण्यासाठी कर्जमाफीची मागणी करण्यात आलीय.. अशातच सत्ताधारी नेत्यांची वादग्रस्त विधानं शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहातायत...सत्ताधारी नेत्यांची ही विधानं ऐका..
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे, म्हणूनच निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो''दुष्काळ पडला तरी आणि नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात. हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला'
राज्यातील 24 लाख 89 हजार 566 शेतकऱ्यांकडे 35 हजार 577 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे... त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा काढला होता... त्यानंतर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शेतकरी नेत्यांची बैठक झाली.. आणि याचं बैठकीत 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचं सांगत सरकारने शेतकऱ्यांची आश्वासनांवर बोळवण केली.. अशातच सत्ताधारी नेत्यांकडून कर्जमाफीविरोधात केलेली जाणारी असंवेदनशील विधानं म्हणजे शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी.. जखमेवरची खपली काढण्यासारखा प्रकार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.