नागपूरात कचरा संकलनासाठी QR कोड; राज्यातील पहिलाच प्रयोग 
महाराष्ट्र

नागपूरात कचरा संकलनासाठी QR कोड; राज्यातील पहिलाच प्रयोग

प्रायोगिक तत्त्वावर १० घरात झाली सुरुवात

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - महापालिकेकडून घरोघरी जाऊन कचरा Garbage संकलनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत कचऱ्याची गाडी वेळेवर आणि नियमित येत नसल्याची अनेकांची तक्रार होती. यावर समाधान शोधण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर क्यु आर कोड पद्धती सुरु करण्यात आली आहे.

याद्वारे कचरा संकलनासाठी आलेल्या गाडीचा चालक त्या घरातील क्युआर कोड स्कॅन QR Code करेल आणि त्यानंतर कुठल्या घरातून कचरा संकलन झाले, याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर १० घरात याची सुरुवात झाली आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे नागपूरचे Nagpur महापौर दयाशंकर तिवारी Dayashankar Tiwariयांनी सांगितले.

हे देखील पहा -

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात महापालिकेने कचरा संकलनासाठी क्युआर कोडची पद्धत सुरु केली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १० घरात ही पद्धत राबवण्यात आल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर महापालिकेचा हा प्रयोग यशस्वी होणार का हे पाहावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांत कचऱ्याची गाडी वेळेवर आणि नियमित येत नसल्याची नागपूरकरांनी तक्रार केली होती. यावर समाधान शोधण्यासाठी मनपाने हा अनोखा प्रयोग राबवण्याचा विचार केला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये आता प्रायोगिक तत्त्वावर क्युआर कोड पद्धती सुरु करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

SCROLL FOR NEXT