परळी नगर पालिकेवर उर्दू भाषेतून फलक लावा; MIM चे बेमुदत उपोषण सुरू विनोद जिरे
महाराष्ट्र

परळी नगर पालिकेवर उर्दू भाषेतून फलक लावा; MIM चे बेमुदत उपोषण सुरू

जोपर्यन्त मागणी पूर्ण केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार.

विनोद जिरे

बीडच्या परळी नगर पालिकेच्या (Beed-Parali) नावाच्या फलकावर उर्दू भाषेतही उल्लेख करावा. ही मागणी घेऊन बीडच्या परळीत एमआयएम आक्रमक झाली आहे. शहरातील नगर पालिकेसमोर, एमआयएमच्या वतीने शेख शफिक शेख रोशन यांच्या नेतृत्वाखाली, बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, की जुन्या नगर परिषदेच्या इमारतीवर, उर्दू भाषेतून नावाचा फलक होता. मात्र नवीन इमारत बांधकाम करण्यापूर्वी तो फलक काढण्यात आला होता. पण नगर पालिकेची, नवीन इमारत होऊन अनेक वर्षे झाली असून आता वापर सुरू आहे. त्यावर अद्याप उर्दू भाषेतील बोर्ड लावण्यात आला नाही.

वारंवार या बाबद मागणी करून देखील येथे बोर्ड लावण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे कंटाळून आज रोजी बेमुदत उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत परळी नगर परिषदेवर उर्दू भाषेच्या नावाचा बोर्ड लावला जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण असेच चालू ठेवणार असल्याचं, उपोषणकर्ते शेख शाफिक शेख रोशन यांनी दिला आहे. दरम्यान अशीचं मागणी बीड नगर पालिकेच्या नावावरून केली जात होती. त्यानंतर या नावाच्या मागणीवरून वाद देखील निर्माण झाला होता. त्यामुळं परळीत देखील हा नावाचा नवा वाद होतो की काय ? असं वाटू लागलंय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT