- राजेश काटकर
Parbhani News : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने विविध ठिकाणी सुरू असलेले रेल्वेच्या मूलभूत सुविधांचे विकास कार्य करण्याकरिता तसेच रेल्वे पटरीचे काम करण्यासाठी लाईन ब्लॉक हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)
दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार या कामांमुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे क्रमांक(07599) पूर्णा - परळी वैजनाथ आणि रेल्वे क्रमांक (07598) परळी वैजनाथ - पूर्णा या दोन रेल्वे आजपासून (ता. 19) 25 जूनपर्यंत असे सात दिवस रद्द करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर अन्य काही गाड्या देखील उशिराने धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तरी प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केेल आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.