Asim Sarode Pune Swargate Bus Depot Case  Saam Tv
महाराष्ट्र

Pune Swargate Bus Depot Case : बलात्कार पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका : असीम सरोदे

Swargate ST Depot Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या चारित्र्यावर कोणीही उडवू नये असे पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. या संबंधित मागणी त्यांनी न्यायालयात केली होती.

Yash Shirke

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. त्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीने न्यायालयात इन कॅमेरामध्ये जबाब नोंदवला आहे. वकिलांनी न्यायालयात तरुणीच्या चारित्र्यावर कुणीही शिंतोडे उडवू नये अशी मागणी केली आहे.

पीडित तरुणीचे वकील असीम सरोदे यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'आम्ही जी मागणी केली होती, त्यावर न्यायालय विचार करणार आहे. माध्यम्यांनी, वकीलांनी, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी जी बेताल विधानं केली ती अत्यंत चुकीची आहेत. बलात्कारग्रस्त तरुणीला सगळ्यांनी मदत करायचे सोडून तिला वाईट ठरवले जात आहे.'

'पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेणारे विधान करणे अत्यंत चुकीचे आहे. केस सुरु असेपर्यंत पीडित तरुणीच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणारं वक्तव्य कोणी करु नये अशी ऑर्डर आज संध्याकाळी निघेल. तिच्यावर अन्याय झाला ही वस्तूस्थिती आहे', असे बलात्कारग्रस्त तरुणीचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले.

'जे न्यायालयात बोलले नाही, ते बाहेर बोलायचे.. आणि त्या गोष्टीला दुसरी काही बाजू आहे असं म्हणायचं', या शब्दांत असीम सरोदे यांनी आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. दत्ता गाडेच्या वकिलांनी या घटनेसंबंधित वक्तव्य केले होते. पुढे त्यांनी यू-टर्न घेत मी असं बोललो नाही असे म्हटले होते. त्यावरुन सरोदे यांनी ही टिप्पणी केली.

नेत्यांना राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते आणि ते वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांना करावा लागतो. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी राजकीय लोक काहीही बेताल वक्तव्य करतात. पीडितेने कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याचे कालच पोलिसांनी सांगितले असे वक्तव्य असीम सरोदे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT