Pune To Solapur Trains Saam TV
महाराष्ट्र

Pune To Solapur : पुणे-सोलापूर फक्त सव्वातीन तासांत, ८८ एक्सप्रेसचा स्पीड वाढला

Pune To Solapur Trains : पुणे ते सोलापूर हा रेल्वेप्रवास अधिक वेगवान होणार आहे. शेकडो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. ८८ रेल्वे एक्सप्रेसचा वेग वाढवणार आहे.

Namdeo Kumbhar

pune to solapur railway express train : पुणे आणि सोलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगात होणार आहे. पुणे आणि सोलापूर या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे एक्सप्रेस गाड्याचा वेग वाढला आहे. रेल्वेच्या वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता पुण्यात अवघ्या सव्वातीन तासांत पोहोचता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवास 35 ते 40 मिनिटांनी कमी होणार आहे. जवळपास ८८ एक्सप्रेस रेल्वेचा वेग आता ११० वरून १३० इतका झालाय.

पुणे-दौंड-सोलापूर सेक्शनवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेकडून पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये ट्रॅक सुधारणा, ओव्हर हेड इक्विपमेंट रेग्युलेशन, सिग्नलिंग कामे आणि इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे दौंड-सोलापूर-वाडी सेक्शनवर (३४१.८० किमी) अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास पर्यंत वाढला आहे.

या विभागांवर एकूण 44 रेल्वे (अप-डाउन ८८ फेऱ्य) सध्याच्या 110 किमी ताशी वरून 130 किमी ताशी वेगवान धावतील. त्यामुळे पुणे ते सोलापूर हे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. एक्स्पेस, मेल आणि डेमो यांचा वेगामुळे प्रवाशांच्या वेळ वाचणार आहे. सोलापूर-पुणे ये-जा करणाऱ्या शेकडो प्रवशांना याचा मोठा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. एक्सप्रेसचा वेग वाढल्यामुळे वेळेची बचत होईलच. पण त्याशिवाय आर्थिक फायदाही होईल.

सध्या ४४ रेल्वेच्या ८८ फेऱ्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. भविष्यात याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेचा स्पीड वाढल्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल. प्रदूषणही कमी होईल. यामुळे मध्य रेल्वेला वाहतुकीच्या इतर पद्धतींपेक्षा स्पर्धात्मक फायदा मिळेल. अधिक प्रवाशांना आकर्षित करणे आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे शक्य होण्यास मदत होईल, असे सांगण्यात येतेय.

या गाड्याचा असल समावेश

पुणे-सोलापूर यादरम्यान धावणाऱ्या उद्यान, हसन, कोईमतुर, कराईकल, कोणार्क, उद्यान, शताब्दी, सिद्धेश्वर, हुतात्मा, चेन्नई, काकीनाडा, बिकानेर, यशवंतपुर, इंटरसिटी, विशाखापट्टणम, नागरकोईल, काकीनाडा, के.के. यासह अन्य 44 गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT