ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime : भरवस्तीत बँकेच्या एटीएमवर दरोडा; गॅस कटरने मशीन कापत १६ लाख लांबवीले

Pune News : मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडी करण्यासोबत चोरट्यांकडून एटीएम मशीन देखील टार्गेट करण्यात येत आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापण्यात येत असते

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. भरवस्तीत रात्रीच्या सुमारास चोरटयांनी हा दरोडा टाकला. सकाळी परिसरातील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडी करण्यासोबत चोरट्यांकडून एटीएम मशीन देखील टार्गेट करण्यात येत आहेत. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापण्यात येत असते. तर बऱ्याचदा थेट मशीनचा घेऊन पसार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येते रात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. 

शिक्रापूर येथे वस्ती असलेल्या भागात एसबीआयचे एटीएम आहे. रात्री उशिरा भर लोकवस्तीच्या ठिकाणी एटीएमवर दरोडा टाकण्यात आला आहे. याठिकाणी चोरट्यानी आतमध्ये प्रवेश करत एटीएम मशीनचा पत्रा गॅस कटरच्या सहाय्याने कापून टाकला. यानंतर यातिल १६ लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. दरम्यान गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मशीन संपूर्ण पाने जळाले आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान एटीएम मशीनमध्ये दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर नागरिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. शिक्रापूर पोलीसांकडुन तपास सुरु करण्यात आला असून एटीएमच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु आहे. मात्र भर वस्तीत चोरट्यांनी एटीएम लक्ष केले असल्याने एटीएमच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

SCROLL FOR NEXT