Pimpri Chinchwad : पत्राशेड काढताना खाली पडून मजुराचा मृत्यू; अनधिकृत बांधकाम काढण्याच्या कारवाईदरम्यान घडली घटना

Pimpri Chinchwad News : महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात येत असल्याने या कारवाई दरम्यान आपल्या मालाचे कमी नुकसान व्हावं; म्हणून काहीजण स्वतःहून पत्री शेड काढून घेत आहेत
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरामध्ये पत्राशेड काढत असताना दुर्दैवी घटना घडली आहे. काम करत असताना तोल जाऊन खाली पडून एका कामगारांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम विरोधात सुरु असलेल्या कामादरम्यान सदरची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

अवदेश यादव (वय ५२) असं सदरच्या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दरम्यान आपल्या पोटाची खडंगी भरण्यासाठी कुदळवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यातील तसेच परराज्यातील कामगार काम करत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका चिखली आणि कुदळवाडी परिसरातील जवळपास पाच हजार अनधिकृत बांधकाम निष्काशीत करत असल्याने कुदळवाडी परिसरातील व्यावसायिक तसेच कामगारांवर उपासमारीचा संकट ओढवल आहे

Pimpri Chinchwad
Parali Crime : दुकान लावण्यावरून दोन गट भिडले; हाणामारी दरम्यान बुलेट पेटवली, परळी तालुक्यातील घटना

स्वतःचाच होता पत्राशेड  

महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करण्यात येत असल्याने या कारवाई दरम्यान आपल्या मालाचे कमी नुकसान व्हावं; म्हणून काहीजण स्वतःहून पत्री शेड काढून घेत आहेत. अशाच प्रकारे पत्रा शेडमध्ये काम करणारे कामगार स्वतःहूनच आता पत्रा शेड काढू लागले आहेत. त्यादरम्यान अवधेश यादव या कामगाराचा पत्रा शेड वरून खाली पडून मृत्यू झाला आहे.

Pimpri Chinchwad
Ambabai Temple : कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी दोन कोटींचे दान; जगदंबा देवी मंदिरात दोन किलोचा सोन्याचा मुकुट

प्लास्टिक पत्र्यावर पाय पडल्याने झाला घात  

महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी अवदेश यादव हा श्रीराम गोडाऊन वरील पत्रा शेड काढण्यासाठी वर चढला होता. या पात्र शेडच्या गोडाऊनमध्ये प्रकाश येण्यासाठी प्लास्टिकचा पत्रा लावण्यात आलेला होता. या पत्र्यावर अवदेश याचा अचानक पाय पडल्याने त्याचा तोल गेला आणि तो खाली पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com