Shirur News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : भरधाव ट्रक घुसला सलून दुकानात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Pune Shirur News : वर्दळीच्या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

रोहिदास गाडगे

शिरूर (पुणे) : पुणे- अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी (ता. शिरूर) येथे रात्री भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानांमध्ये घुसला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सुदैवाने यात कोणचाही जीव गेला नाही. 

पुणेकडून (Pune) अहमदनगरकडे जाताना चालकाचा ट्रॅकवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातावेळी सलून व्यवसायिक हे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. शिवाय वर्दळीच्या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, (Accident) अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

सदर अपघातात सलून व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या लोकांच्या जीवितला धोका निर्माण झाला होता परंतु मराठी युक्तीप्रमाणे देव तारी त्याला कोण मारी या (Shirur) म्हणी प्रमाणे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहन चालक यांच्याकडून नुकसान भरपाईसह कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महावितरणला अदानी पॉवरकडून स्वस्त वीज खरेदीस एमईआरसीची मंजुरी

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

मुंबईकरांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेवर धावणार १२ नव्या AC लोकल; वेळापत्रक पाहिलेत का?

नाश्त्याला रव्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, न खाणारेही खातच राहतील

Thane Fort : सह्याद्रीच्या उंच शिखरावर वसलेला किल्ला, ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT