Pune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट ! SaamTv
महाराष्ट्र

Pune : सांगवीत ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटर मध्ये सुरु होते सेक्स रॅकेट !

सांगवीतील ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटरमध्ये काही मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गोपाल मोटघरे

पुणे : सांगवीतील कृष्णा चौक येथील शाहू पॅलेस मधील दुसऱ्या मजल्या वरील फ्लॅट नंबर 11 या ठिकाणी ब्रायडल स्पा अँड ब्युटी सेंटरमध्ये काही मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत आहे, अशी गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ मुलींची सुटका केली आहे.

हे देखील पहा :

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक तयार करून पोलिसांनी हा सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करून महिलांची सुटका केली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिला ह्या नेपाळच्या असून तर एक महिला आसाम, एक महिला पश्चिम बंगाल, एक महिला दिल्ली आणि एक महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे.

या धाड प्रकरणात सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये स्पा सेंटरचे मालक पार्थ सारथी महंती आणि मॅनेजर शेख लतीफ निजाम या दोघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि भादंवि कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT