Congress Secretary Sonali Marne joins Shiv Sena in presence of Maharashtra Deputy CM Eknath Shinde Saam
महाराष्ट्र

Politics: मोठी बातमी! पुण्यात काँग्रेसला मोठा झटका, फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री

Pune Politics: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; सोनाली मारणे यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला असून आगामी स्थानिक निवडणुकांआधी काँग्रेससाठी ही मोठी हानी मानली जाते.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

पश्चिम महाराष्ट्रात एकामागोमाग एक दिग्गज नेते काँग्रेसची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशातच पुण्यातही काँग्रेसला मोठा खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या फायरब्रँड महिला नेत्या सोनाली मारणे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

सोनाली मारणे या २०११ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. पुण्यात काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, पक्षात कार्य करत असताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सोनाली यांनी स्पष्ट केलं की, 'ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून पक्षाने काम करायला हवे तसे पक्षात काम होत नाही, याची खंत आहे. जे काँग्रेस पक्षात योग्य काम करतात त्यांना न्याय दिला जात नाही. निवडणूक आकडेवारीपेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं हे पक्षाचं अपयश आहे', असं त्यांनी राजीनाम्यापत्रात नमूद केलं.

राजीनामा देत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. आज दुपारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत असल्यामुळे पुण्यात शिंदे गट अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

SCROLL FOR NEXT