Protests outside Pune Police Commissioner’s Office after alleged assault on Dalit girls by police officers. Saam Tv
महाराष्ट्र

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

Pune Police Assault On Dalit Girls: पुण्यात चक्कं पोलिसांनीच मुलींच्या रुममध्ये घुसून गुंडगिरी केल्याने नव्या वादाची ठिणगी पडलीय...याच कारणामुळे कायद्याचे धिंडवडे निघालेत... पुण्यात नेमकं काय घडलं?

Bharat Mohalkar

हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात....आणि त्याला कारण ठरलंय तीन दलित मुलींच्या रुमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण.. पोलीसांनी थेट मुलींच्या रुमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय..मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात...

नेमकं प्रकरण काय?

संभाजीनगरमधील 23 वर्षीय विवाहिता पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यात

पीडित विवाहितेला पुण्यातल्या 3 मुलींकडून मदत, एका रात्रीपुरता राहायला आसरा

संभाजीनगर, कोथरुड पोलिसांकडून मुलींची चौकशी

पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप

कोथरुडच्या PSI प्रेमा पाटील, संभाजीनगरचे PSI अमोल कामटे, कॉन्स्टेबल संजीवनी शिंदेंवर मारहाणीचे आरोप

पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. मात्र पोलिसांकडून चौकशीचं कारण देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.. त्यावरुन सामाजिक संघटनांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला... तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी पोलीसांवर गंभीर आरोप केलाय...

दलित मुलींना त्यांच्या रुममध्ये घुसून पोलिसांनी केलेली मारहाण ही सार्वजनिक ठिकाणी नसल्याचं कारण देत पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला... मात्र कायद्याचे रक्षक पोलीसच मुलींच्या रुमवर जाऊन गुंडगिरी करणार असतील तर कायद्याचे धिंडवडे निघत राहतील... त्यामुळे पोलीस खात्याची अब्रू वाचवण्यासाठी गुंड पोलिसांवर कारवाई करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT