Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने संपविले जीवन; पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune News : पती मधुकर ओव्हाळ यांच्याकडून त्रास दिला जात असल्याने मोनिका यांनी मंगळवार पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : पतीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची घटना (Pune) पुण्याच्या येरवड्यातील नागपूरचाळ येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी पतीस पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे.

येरवड्याच्या (Yervada) नागपूरचाळ येथील मोनिका मधुकर ओव्हाळ (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मोनिका ओव्हाळ या पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय ४०) वास्तव्यास होत्या. दरम्यान पती मधुकर ओव्हाळ यांच्याकडून त्रास दिला जात असल्याने मोनिका यांनी मंगळवार पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मधुकर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

१० मी पर्यंत पोलीस कोठडी 

दरम्यान या प्रकरणातील आरोपी पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच आरोपी पतीला १० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT