Pune Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Pune News: गाळात अडकले, अनर्थ घडला! फर्ग्युसन कॉलेजमधील २ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे

Mulshi Talav News: मित्र मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी (ता. २१ ऑक्टोबर) मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर गाळामध्ये अडकून दोघेजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

रविवारची सुट्टी असल्याने फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेणारे चैतन्या जयंत कांबळे,ओजस आनंद कठापुरकर , राज संभाजी पाटील, आदेश राजेंद्र भिडे, सुमेध सतीश जोशी, प्रशांत संभाजी आरगडे, तेजस्विनी साहेबराव पवार, निधी सत्यनारायण हळदंडकर, तृप्ती चंद्रकांत देशमुख हे विद्यार्थी मुळशी तलाव परिसरा फिरायला गेले होते. यावेळी ते सर्व जण पोहण्यासाठी पाण्यात उतरले.

मात्र ओजस कठापुरकर आणि राज पाटील हे दोघेही गाळाचा अंदाज न आल्याने त्यात अडकले आणि बुडू लागले. इतर मित्रांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मुलांचे मृतदेह शोधून काढले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची ७ राखीव जागेवर दावेदारी

Bhandara News : माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशानंतर मविआत बिघाडी; नाराज पदाधिकारी मेळाव्यात ठरविणार भूमिका

Maharashtra Politics: जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर रंगणार संघर्ष?

Goa Travel : गोव्याजवळील 'हा' Hidden Spot पाहिलात का? हिवाळ्यात भेट द्याच

Lay Avadte Tu Mala: "सरकारच्या जवळ कुणीही येऊ नये" सईने दिला इशारा 'लय आवडतेस तू मला' मालिकेमध्ये आला नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT