Pune Police Saam tv
महाराष्ट्र

Pune Police : मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन; पुणे पोलिस दलात खळबळ, भाऊ- बहिणीवरही गुन्हा दाखल

Pune News : पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत विजय जाधव असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: पुण्याच्या पोलीस दलात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या बहीण, भाऊ अन्य काही जणांना सोबत घेऊन एका जनाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेण्यात आली असून पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या या शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे पोलीस मुख्यालयात कार्यरत विजय जाधव असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विजय जाधव हे आर कंपनी पोलीस मुख्यालय, पुणे शहर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्यासह त्यांचा भाऊ विकी जाधव, बहिण आणि बहिणीचे पती आणि इतर २ सहकारी यांचेसोबत संगनमत करुन बेकायदेशीर जमाव जमवून हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेवून मारहाण केल्याची तक्रार ओंकारसिंग गुलचंदसिंग भौड यांनी दिली होती. 

निलंबन करत भाऊ- बहिणीवर गुन्हा दाखल 

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणी चौकशी केली. यात विजय जाधव यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांच्यावर बेशिस्त, बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर विजय जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ 
निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस आमच्या बाजूने तक्रार दाखल करून घेत नाहीत, म्हणून या शिपायाने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ  घातला. इतकेच नाही तर तक्रार घेतली नाही म्हणून पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan: सलमान भाईजानचा जलवा कायम; सिनेमा रिलीज होण्याआधीच केला 300 कोटीपेक्षा जास्त गल्ला

India Tourism : हिरवगार जंगल, धबधबे, व्हॅलीचे सौंदर्य; सर्वकाही एकाच ठिकाणी, 'हे' आहे स्वर्गाहून सुंदर ठिकाण

Chandrashekhar Bawankule: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Pooja Sawant Lovestory: आईच्या मैत्रिणीमुळे झाली ओळख, कशी आहे? पूजा सावंतची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update : सोलापुरात धावत्या कारला अचानक भीषण आग

SCROLL FOR NEXT