Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News : घरांच्या कड्या लावून माजविली दहशत; मध्यरात्री गाड्यांची तोडफोड

घरांच्या कड्या लावून माजविली दहशत; मध्यरात्री गाड्यांची तोडफोड

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
:  मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सराईत गुंडांकडून वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार सुरू आहे. (Pune) सहकारनगर, भारती विद्यापीठ पाठोपाठ आता खडकी पोलीस (Police) ठाण्याच्या गुन्हेगारांकडून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

पुण्यातील खडकी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने आणि दांडक्याने पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. तर पडवळ वस्तीतील नागरिकांच्या घराच्या बाहेरून (Crime News) कड्या लावल्या. हातातील हत्यारे हवेत उंचावून आरोपींनी आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागल्यास एकेकाला बघून घेऊ; असे म्हणत दहशत निर्माण केली.   
   

६ जणांवर गुन्हा दाखल 
औंध रस्त्यावरील वीर भगतसिंग चौकात 16 जुलैच्या रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ओंकार युवराज सोकटे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आदित्य भारती शेडगे, तेजस उर्फ बलमा गायकवाड यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल केले असून यातील ४ आरोपी अल्पवयीन आहेत. खडकी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT