श्रीरंग बारणे 
महाराष्ट्र

राणेंनी लोकांच्या करमणुकीत भर घालू नये : खासदार श्रीरंग बारणे

राणेंनी लोकांच्या करमणुकीत भर घालू नये ः खासदार श्रीरंग बारणे

दिलीप कांबळे

मावळ (पुणे) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने मोठे केले आहे. त्यांनी जबाबदारीने बोलावे, दिलेल्‍या मंत्रीपदाचा लोक कल्याणासाठी वापर करावा. नुसतं आपल बोल घेवड्या सारखं काही ही बरळू नये आणि लोकांच्या करमणुकीत भर घालू नये असा सूचक सल्ला मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राणे यांना लगावला आहे. (pune-news-maval-taluka-pawana-dam-mp-sreerang-barane-statment-and-target-narayan-rane)

मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण ९८ टक्के भरले. त्याबद्दल त्‍यांच्‍या हस्‍ते जलपूजन केले त्यावेळी ते बोलत होते.

मावळात पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने संपूर्ण पिंपरी- चिंचवड शहरासह मावळला पाणी पुरवठा करणारे पवना धरणाची वाटचाल शंभरीकडे आहे. सध्या ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पुनरागमन केल्याने धरण फुल्ल झालेय. गेल्या वर्षभरापासून पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून आता तरी पाणी कपातीचे संकट दूर होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला. मात्र पिंपरी चिंचवड शहरात सत्तेत असणारे भाजप हे निष्क्रिय ठरले आहे. अमृत योजना असेल किंवा चोवीस बाय सात ही योजना राबवल्या कोट्यावधी रुपये खर्च केले. पण शहराच एक वेळ सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की अजूनही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT