Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune : गोल्फचा चेंडू मैदानाबाहेर, दुचाकीस्वाराला लागला, गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

Pune News : चेंडू जोरदार छातीवर लागल्याने प्रणील घाबरला होता. त्यानंतर हा चेंडू उड्डाण पुलावरील इतर वाहनांवर देखील जाऊन आदळला. या घटनेनंतर प्रणिल यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : गोल्फ खेळत असताना मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. मैदानाबाहेर जवळच रहदारी असलेल्या रस्त्यावर जाऊन पडला. हा चेंडू थेट दुचाकीस्वाराच्या छातीवर जाऊन आदळला. त्यानंतर इतर वाहनांवर देखील हा चेंडू आदळला. हा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्सच्या मैदानावर सराव सुरु असताना घडला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे शहरातील येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब मैदानावर सराव सुरु असतो. सराव सुरु असताना एकाने मारलेला हा चेंडू थेट मैदानाबाहेर जाऊन पडला. दरम्यान फिर्यादी  प्रणील अनिल कुसळे (वय ३५) आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी दुचाकीने येरवडा परिसरातील गुंजन चौकातून जेल रस्त्याकडे जात होते. याचवेळी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची दुचाकी उड्डाणपूलावर आली असताना गोल्फ क्लबच्या मैदानातून आलेला पांढऱ्या रंगाचा चेंडू प्रणीलच्या छातीवर आदळला. 

दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल 

चेंडू जोरदार छातीवर लागल्याने प्रणील घाबरला होता. त्यानंतर हा चेंडू उड्डाण पुलावरील इतर वाहनांवर देखील जाऊन आदळला. या घटनेनंतर प्रणिल यांनी येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. तक्रार अर्ज दिल्यानंतर दोन दिवसांनी येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दीड वर्षांपूर्वी घडला असाच प्रकार 
दरम्यान गोल्फ क्लब मैदानातून चेंडू बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी म्हणजे दीड वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. गोल्फ क्लब मैदानातून आलेला एक चेंडू दुचाकीस्वाराच्या तोंडावर आदळला होता. त्यावेळी देखील येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा घडल्याने येथील सुरक्षेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT