Khadakwasla Dam Saam tv
महाराष्ट्र

Khadakwasla Dam : खडकवासला कालव्यातून पाणी उपसा; ३ शेतकर्‍यांवर कारवाई

Pune News : २३ एप्रिलला वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील शेतकरी वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणी उपसा चालू असल्याचे निदर्शनास आले

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

 
पुणे
: खडकवासला धरणातून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. असे असताना देखील धरणाच्या (Pune) उजव्या कालव्यातून विना अनुमती पाणी उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. अशा पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्या ३ शेतकऱ्यांवर (Farmer) जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

खडकवासला (Khadakwasla) धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन चालू आहे. आवर्तन चालू झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी (Baramati) बारामतीचे प्रातांधिकारी वैभव नवाडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्यासह कालवा परिसराची पहाणी केली. या पाहणी दरम्यान २३ एप्रिलला वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील शेतकरी वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणी उपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खडकवासला उजव्या कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्‍या शिर्सुफळ येथील ३ शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. आवर्तन चालू केल्यानंतर कालव्याच्या दोन्ही बाजूंनी विना अनुमती पाणी उपसा केला जातो. त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी १४४ कलम लागू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT