Narayan Rane, manoj jarange patil saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane On Manoj Jarange : कोण मनोज जरांगे? मी नाही ओळखत, त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा : नारायण राणे

Narayan Rane On Manoj Jarange Patil: केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यामध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी हे विधान केले.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, पुणे| ता. ३० नोव्हेंबर २०२३

Narayan Rane News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात मराठा- ओबीसी नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून मराठा बांधवांना आरक्षण मिळावे अशी मागणी केलीय. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाज ओबीसीतून आरक्षण घेणार नाही, असे म्हणत कोण जरांगे पाटील? त्यांना ओळखत नाही असे विधान केले आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पुण्यामध्ये आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) यांनी हे विधान केले.

काय म्हणाले नारायण राणे?

"मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण घेणार नाही. जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा ते अजून वयाने लहान आहेत. त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारला असता जरांगे यांच्यावर प्रश्न विचारला असता, कोण आहे हा? मी नाही ओळखत.." असे नारायण राणे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश आंबेडकर यांनी राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचे विधान केले होते. या विधानावर बोलताना नाराय राणे यांनी प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो दंगलीविषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्यांची दखल घ्यायला हवी, त्यांची चौकशी करायला हवी," असे नारायण राणे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT