Pune Police Saam tv
महाराष्ट्र

Pune Police : पुण्यातून ६४ गांजा जप्त; धुळे आणि ओडिसा येथील तरुण ताब्यात

Pune News: अंमली पदार्थ विक्रीस बंदी असताना मोठ्या शहरांमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला जातो. अशाच प्रकारे विक्रीसाठी आणलेला अंमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली

Rajesh Sonwane

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १३ लाख रुपयांचा तब्बल ६४ किलो गांजा जप्त केला आहे. यात धुळे आणि ओडिशा येथून आलेल्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या असून या कारवायांमध्ये तब्बल १३ लाख २८ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. 

अंमली पदार्थ विक्रीस बंदी असताना मोठ्या शहरांमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला जात असतो. अशाच प्रकारे विक्रीसाठी आणलेला अंमली पदार्थ जप्त करण्याची कारवाई पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पुणे शहरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असून यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

ओडिसा येथील दोघे ताब्यात 

पहिल्या कारवाईमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना २ तरुण पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विकत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांचजवळ ३० किलोचा ६ लाख २४ हजार रुपयांचा गाजा मिळून आला. याप्रकरणी पप्पू देवरी (वय ३२), चंदन कुंवर (वय १९) हे दोघे ही राहणारे ओडिशा यांना पोलिसांनी अटक केली आहे

धुळ्यातील तरुण ताब्यात 
दुसऱ्या प्रकरणात गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना वाकडेवाडी येथे असलेल्या एसटी स्टँडजवळ २ तरुण गांजा विकत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ ३४ किलो गांजा ज्याची किंमत ७ लाख चार हजार रुपयांचा गांजा मिळून आला. याप्रकरणी राकेश पावरा (वय २५) आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघे ही धुळे जिल्ह्याचे राहणारे आहेत. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT