Pune near Indapur Terrible accident between car and pickup Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Accident : यात्रेच्या डेकोरेशनला जाताना भीषण अपघात, भरधाव कारची पिकअपला धडक; रस्त्यावर काचेचा थर

Pune Baramati Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी नंबर एक नजीक भीषण अपघात झाला आहे. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील वेताळ बाबाच्या यात्रेसाठी हे लोकं लाईट डेकोरेशनच्या कामाकरता निघाले होते.

Prashant Patil

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर १ येथे ह्युंडाई कंपनीच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने पिकअप आणि ह्युंडाई कारचा अपघात झाला आहे. यात १० ते १२ लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून हे सर्व लोक दौंड तालुक्यातील कानगाव मधील असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील वेताळ बाबाच्या यात्रेसाठी हे लोकं लाईट डेकोरेशनच्या कामाकरता निघाले होते. अशी माहिती स्थानिकांकडून मिळत असून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी नंबर एक नजीक हा अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये पिकअप गाडी रस्ता दुभाजक तोडून बाजूला फरफटत गेली. यावेळी पिकअप मधील सुमारे १० ते १२ लोकं रस्त्यावर जखमी होऊन पडले. यातील ४ ते ५ लोकं गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात समजताच स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ बचावकार्य करत चार रुग्णवाहिका मागवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT