Pune Katraj Friend murder SaamTV
महाराष्ट्र

घटस्फोटीत बायकोला शिव्या, रॉड घालून हत्या, रक्ताने माखलेल्या फोनवरुन आरोपीचा तपास; पुण्यातील धक्कादायक हत्याकांड

Pune Latest Crime News : या घटनेत नवीन प्रसाद याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी बिरण मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये पळून गेला होता. इकडे दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Prashant Patil

पुणे : बिरण सुबल आणि नयन प्रसाद दोघे मित्र पश्चिम बंगालचे. कामानिमित्त पुण्यात आले आणि कात्रज परिसरात राहू लागले. त्या दिवशी मात्र भयंकर घडलं. ८ फेब्रुवारीच्या रात्री दोघेही आंबेगाव पठार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मद्यपान करत बसले होते. मद्य प्राशन केल्यानंतर बिरण सुबल याला घटस्फोटीत पत्नीची आठवण झाली. त्याने फोन केला. मात्र फोन उचलला गेला नाही. हे पाहून नयन प्रसाद याने खालच्या भाषेत कमेंट केली आणि हाच राग अनावर झाल्याने बिरण याने शेजारीच पडलेली लोखंडी पहार घेऊन नवीन प्रसाद याच्यावर वार केले.

या घटनेत नवीन प्रसाद याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी बिरण मूळ राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये पळून गेला होता. इकडे दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह सडू लागल्याने मयताची ओळखही पटत नव्हती. खून झालेला आणि आरोपी कोण याचा तपासही लागत नव्हता. मात्र, त्या ठिकाणी रक्ताने माखलेला एक मोबाईल पोलिसांना सापडला. रक्ताने माखलेला हा मोबाईलच शेवटी बोलला. या मोबाईलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी आरोपी बिरण सुबल कर्माकर याला पश्चिम बंगालमधील हावडा या ठिकाणी जाऊन बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT