महाराष्ट्र

Pune News: हृदयद्रावक! पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू, अख्खा गाव शोकाकुल

Twin Kids Drown In Lake: जुन्नर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृ्त्यू झाला आहे. या दुःखद घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

जुन्नर तालुक्यातील वसईवाडी येथील तळेरान गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जातेय. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे, अशी मृत मुलांची नावं आहेत.

साबळे कुटुंबीय कपडे धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावावर गेले होते. त्यावेळी कुटुंबातील व्यक्ती कपडे धुण्यात व्यस्त असताना श्रावणी आणि गणेश हे दोन्ही तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता-खेळता दोघेही पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाली. काही वेळाने मुले दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या दुर्दैवी घटनेनंतर गावकऱ्यांनी जलस्रोतांवर सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनानेही याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होतेय.

शेततळ्यात सापडला ६ वर्षीय मुलीचा मृतदेह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी शिवारातील शेततळ्यात पडून अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव तनुजा रवी राठोड असे आहे. ती आपल्या कुटुंबासोबत पळशी शिवारात राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, खेळता खेळता तिचा तोल जाऊन ती शेततळ्यात पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT