ही संतापाची लाट आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधातील.. आणि त्याला कारण ठरलंय... हॉस्पिटलचा पराकोटीचा हलगर्जीपणा. प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला आणि तिची दोन नवजात बाळं आईला कायमची पोरकी झाली. दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? पाहूयात....
दीनानाथ नाही धन्नासेठ
प्रसुती कळा सुरु झाल्याने तनिषा भिसेला दीनानाथ रूग्णालयात आणलं
गर्भवती महिलेला अॅडमीट करुन घेण्यासाठी 20 लाखांची मागणी
तीन लाख भरण्यास तयार असतानाही अॅडमीट करुन घेण्यास नकार
पैसे नसतील तर ससूनमध्ये न्या, रुग्णालयाचा मुजोरपणा
दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर जुळ्या मुलांना जन्म देत तनिषा भिसेचा मृत्यू
मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन पैशांसाठी अडून बसल्यानेच तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय...
रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रीया उमटल्या.. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने स्वत:च एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली... या चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...
रुग्णालयानं जबाबदारी झटकली
महिलेची ट्विन्स प्रेगन्सी धोकादायक होती
महिलेने 6 महिने तपासणी केली नाही
अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार
जमेल तेवढे पैसे भरून अॅडमीट होण्याचा सल्ला टाळल्याचा दावा
मात्र हॉस्पिटलचा चौकशी अहवाल दिशाभूल करणारा असल्याचं सांगत भिसे कुटुंबियांनी पुरावेच दाखवलेत...
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलीय...
एकीकडे दोन-दोन लेकींच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे त्यांनी जन्मतःच आई गमावल्याचं दुख.या घटनेने भिसे कुटुंबीयांसह पुणे शहर हादरून गेले आहे. मात्र धर्मादाय हॉस्पिटल असतानाही गर्भवती महिलेची पैशासाठी अडवणूक का? असंवेदनशील प्रशासनावर आणि डॉक्टरांवर काय कारवाई होणार? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत..पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडत असतील राज्यात अशा किती तनिषा असतील ज्यांना आपला जीव गमवावा लागला असेल..रूग्णसेवेचं ब्रीद न पाळता केवळ धंदेवाईक होत चाललेल्या हॉस्पिटलच्या मुजोरपणाला चाप लावण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.