Pune cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीवर नफा देण्याचे आमिष; महिलेची ३२ लाखात फसवणूक

Pune News : पुणे शहरातील नारायण पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेची फसवणूक झाली आहे. तक्रारदार महिला फेसबुकवर सर्फिंग करीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या आमिषाला बळी पडून फसवणूक केली जात आहे. अशा प्रकार पुण्यात समोर आला आहे. यात  शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास त्यावर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष समोरच्याने दिले. या आमिषाला बळी पडल्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली.

पुणे शहरातील नारायण पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेची फसवणूक झाली आहे. तक्रारदार महिला फेसबुकवर सर्फिंग करीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. यात त्याने आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का? अशी विचारणा केली. त्यावर महिलेने गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेस व्हॉटसॲपवर लिंक पाठवून ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. यानंतर या ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिली. 

सुरवातीला दिला गुंतवणुकीवर परतावा 
सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील योजनांची माहिती दिली. त्यावर महिलेने चोरट्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी महिलेला सुरुवातीला काही परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यानुसार महिलेने टप्प्याटप्प्याने आणखी रक्कम गुंतविली. त्यानंतर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने महिलेस बॅंक खात्यात वेळोवेळी ३२ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. परंतु महिलेला कोणताही परतावा मिळाला नाही.

 पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस स्टेशन गाठल. या प्रकरणी सदर महिलेने २९ जानेवारी रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती- तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT