Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune Cyber Crime : पोलीस असल्याचे सांगत गंडविले; पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखात फसवणूक

Pune News : पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेउन आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना गंडविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याच्या बहाण्याने पुण्याच्या पाषाण आणि सदाशिव पेठेतील दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन ७० लाख रुपये चोरी केले. हा प्रकार २२ ऑक्टोम्बरला समोर आला. याबाबत पाषाणमधील एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे (Pune) शहरात सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेउन आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे पाषाण परिसरामधील ज्येष्ठ नागरिकास सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संदेश पाठविला होता. यात चोरट्यांनी त्यांना पोलिस दलातील बनावट ओळखपत्र पाठविले. (Cyber crime) तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचे गैरव्यवहार झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी पैसे जमा करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत खात्यातून ४५ लाख रुपये परस्पर काढून घेतले. 

तर दुसऱ्या एका घटनेत टिळक रस्ता परिसरात सदाशिव पेठेतील एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात आला आहे; अशी भीती दाखवून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. माहिती मिळताच चोरट्यांनी त्यांच्या बॅंक खात्यातून २५ लाख ४० हजार रुपये चोरी केले. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT