Nandurbar News : नंदुरबारमध्येही होणार सांगली पॅटर्न; काँग्रेसचे पदाधिकारी करणार बंडखोरी, उमेवारीवरून नाराजी

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. परंतु बाहेरून आलेल्यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे नाराजीनाट्य देखील उफाळून येत आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी घोषित करण्यात येत आहे. यासोबतच पक्षातच अंतर्गत नाराजी पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी ठोस भूमिका घेत पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करत पक्षातीलच पदाधिकारी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. असेच चित्र नंदुरबारच्या शहादा- तळोदा मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती, महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. परंतु बाहेरून आलेल्यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे नाराजीनाट्य देखील उफाळून येत आहे. त्यानुसार काँग्रेसची विधानसभा निवडणूक उमेदवारांचे यादी जाहीर होण्यापूर्वी (Shahada) शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघात तीव्र नाराजी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणाऱ्या प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळत असल्याची चर्चा असल्याने (Congress) काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Nandurbar News
Ambarnath Crime : जमिनीच्या वादातून इस्टेट एजंटची हत्या; अंबरनाथमधील घटनेचा काही तासातच उलगडा!

बाहेरील पक्षातून आलेल्या उमेदवाराला आयत्या वेळेस उमेदवारी मिळत असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान या चर्चेमुळे काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेल्या सात उमेदवारांनी एकत्र बसत भूमिका ठरवली आहे. यात ५ जिल्हा परिषद सदस्य व १७ पंचायत समिती सदस्य असून अनेक आजी माजी पदाधिकारी आणि सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून सांगली पॅटर्नच्या तयारीत आहेत. अर्थात राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यास नाराज पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी करण्याची तयारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com