Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime : महिलांचा वेश करून कंपनीमध्ये चोरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार, सराईत चोरटे अटकेत

Pune News : तोंडाला ओढणी व स्कार्फ बांधून कंपनीतील खोलीतून तांब्याच्या तारांचे बंडल व पट्ट्या चोरून पोबारा केला. कंपनी मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वानवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली

Rajesh Sonwane

सचिन जाधव

पुणे : पुणे शहरातील काही भागात चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यात महिलांसारखा वेष परिधान करून रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत चोरी करण्यात आली होती. या ठिकाणाहून तब्बल दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना दोन सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्याच्या रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफॉर्मर कंपनीत २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही चोरी झाली होती. दरम्यान या प्रकरणी अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपीकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आला आहे. 

गाऊन, सलवार घालून चोरी  
चोरट्यांनी कंपनीच्या खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांमधील एका चोरट्याने पिवळा गाऊन, तर दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीज परिधान केली होता. त्यानंतर तोंडाला ओढणी व स्कार्फ बांधून कंपनीतील खोलीतून तांब्याच्या तारांचे बंडल व पट्ट्या चोरून पोबारा केला. कंपनी मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वानवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

चोरीची दिली कबुली 

यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यात चोरट्यांनी महिलांसारखा वेश परिधान केल्याचे उघडकीस आले. याचा तपास करताना दोन्ही चोरटे पोलिसांच्या ताब्यात सापडले आहेत. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली दिली असून तांब्याच्या तारा, पट्ट्या, हार्ड डिस्क असा दोन लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT