Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News : घृणास्पद कृत्य; टोळक्याने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा

Pune News घृणास्पद कृत्य; टोळक्याने अल्पवयीन मुलाला खाऊ घातली कबुतराची विष्टा

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 

पुणे : कबुतर चोरले म्हणून टोळक्याने हत्यार फिरवत दहशत माजवली. इतकेच नाही तर अल्पवयीन (Pune) मुलाला त्याच कबुतराची विष्टा खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कात्रज (Katraj) भागात २५ जुलै रोजी ही घटना घडली असून अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाने आरोपींच्या जागेवरून कबुतर चोरले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी कात्रज भागात हत्यार घेऊन दहशत माजवली. कोणी मध्ये आले तर एका एकाला तोडून टाकेल, अशी धमकी देत या तरुणांनी हैदोस घातला. त्या अल्पवयीन मुलाला शोधून त्याला गाडीवर घेऊन एका ठिकाणी नेले आणि त्याला त्या ठिकाणी कबुतराची विष्टा खाऊ घातली. 

तिघांवर गुन्हा दाखल 
जर हे कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही; अशी धमकी या आरोपींनी त्याला दिली. घडलेला सगळा प्रकार अल्पवयीन मुलाने वडिलांना येऊन सांगितला. तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. यावरून गणेश दोडमणी, ओम पंडित, अमोल आदम या तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT