Pune Nashik Highway Accident: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Nashik Highway Traffic Update: अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वाहने हटवण्याचे काम सुरू आहे.
Pune Nashik Highway Accident
Pune Nashik Highway AccidentSaamtv
Published On

Pune Nashik Highway Traffic Jam: पुणे नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Nashik Highway Accident
Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार?; आज ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर (Pune- Nashik Highway) चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या चार- पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वाहने हटवण्याचे काम सुरू आहे...

Pune Nashik Highway Accident
Sambhaji Bhide in Nagpur : वंचितचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडेंचे समर्थक आमने-सामने, दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com