Pune Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime: वाहन चोरीचे दहा गुन्‍हे उघड; सव्‍वासात लाखाचा मुद्देमाल जप्‍त

वाहन चोरीचे दहा गुन्‍हे उघड; सव्‍वासात लाखाचा मुद्देमाल जप्‍त

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात हडपसर पोलिसांनी वाहन चोरीचे दहा गुन्हे उघड करून सात लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर (Hadapsar) पोलिसांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या कारवाईमध्ये २७ दुचाकी आणि एक चार चाकी गाडीच्या (Police) चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. (Latest Marathi News)

पुणे हडपसर पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून दत्ता शिवाजी दहिफळे आणि बाबुराव धर्मराज तोंडे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दत्ता दहिफळेला अटक करून दहा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी दुचाकी पुण्यासह (Pune News) इतर जिल्ह्यातूनही चोरी केल्या होत्या. त्याचा तपास आता हडपसर पोलीस करत आहेत

साडेतीन महिन्‍यात २३ लाखाचा मुद्देमाल जप्‍त

हडपसर पोलिसांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या कारवाईमध्ये २७ दुचाकी आणि एक चार चाकी गाडीच्या चोरीचे गुन्हे उघड केले आहेत. या कारवाईमध्‍ये २३ लाख ५० हजार रूपयांचाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT