Crime At Mumbai Goa Highway Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Goa: इथंच ठाेकेन! मुंबई गोवा महामार्गावर पुणेकरांनी बस चालकावर राेखली रिव्हॉल्वर

या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) वडखळ नव्या पुलावर चार चाकी वाहनास थोडासा बसचा धक्का लागल्याच्या रागातून चार चाकी चालकाने भाईगिरीची भाषा वापरून बस चालकावर रिव्हॉल्वर रोखून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. 24) घडली. या घटनेनंतर दाेन्ही बाजूच्या तक्रारीची दखल घेत वडखळ पोलीस ठाण्यात चार चाकी आणि बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराबाबत अद्याप कोणालाही अटक (arrest) केलेली नाही. रिव्हॉल्वर दाखविणाऱ्या दोघांना अटक करण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती वडखळ पोलीस (police) निरीक्षक बाबा कुंभार यांनी दिली. (raigad latest marathi news)

मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कारला जेएसडब्लू कंपनीच्या बसचा धक्का लागला. धक्का लागल्यानंतर बस चालक थांबला नाही. याचा राग मनात धरुन कार चालकाने बसचा पाठलाग करून वडखळ नव्या उड्डाण पुलावर कार बसच्या समाेर आडवी उभी केली. त्यामुळे बस थांबली. त्यानंतर काहींनी कार मधून उतरून बस चालकास शिवीगाळ करून मारहाण केली. कार चालक हे पुणे (pune) येथील हाेते अशी प्राथमिक माहिती मिळाली.

यावेळी कारमधील एकाने खिशातून रिव्हॉल्वर काढून चालकावर रोखून धरले आणि 'मी कोण आहे माहीत आहे का, इथेच ठोकेल असे बोलून मारहाण केली. बस चालक या प्रकाराने भयभीत होऊन पळाला. या प्रकाराबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. सध्या हा व्हिडीओ जिल्ह्यात व्हायरल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT