Pandharpur भारत नागणे
महाराष्ट्र

विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनासाठी 73 कोटींची तरतूद; मंदिराला मूळ स्वरुप प्राप्त होणार

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वागत केले आहे.

भारत नागणे

पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत अससेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये सुमारे 73 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयामुळे विठ्ठल मंदिराला मूळ स्वरुप प्राप्त होणार असून मंदिराचे रुप पालटणार आहे. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वागत केले आहे.

वास्तु कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या विठ्ठल मंदिराला मुळ रुप प्राप्त व्हावे व त्याच बरोबर मंदिराचे संवर्धन व्हावे यासाठी मंदिर समितीने आराखडा तयार करुन तो भारतीय पुरात्व खात्याकडे मंजूरीसाठी पाठवला होता. पुरात्व खात्याने मंदिराची पाहणी करुन आराखड्यास मंजुरी दिली होती.

त्यानंतर हा आराखडा राज्य शासनाकडे मंजूरीसाठी पाठवला होता. त्यानंतर अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मंदिर विकासासाठी राज्य सरकारने 73 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे. अनेक वर्षाच्या वारकर्यांच्या या मागणी यश आले असून मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे देखील पहा -

पंढरपूरचे विठ्ठल रूक्मिणी मंदिराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टया मोठे महत्व आहे. काळाच्या ओघात मंदिरामध्ये अनेक बदल झाले आहेत. पुरातन असलेल्या या मंदिराच्या अनेक भागाला तडे गेले आहेत. त्यामुळे मंदिराचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गेल्या 50 वर्षापासून मंदिराचा विकास आराखडा प्रस्तावित होता.

यासाठी वारंवार पाठपुरावा सुरु होता. कोरोनामुळे दोन वर्षापासून मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने मंदिर विकासाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेच्या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने मंदिर विकास आराखड्यास मान्यता दिली आहे.

या आराखड्यामध्ये विठ्ठल मंदिर व सभामंडप, रूक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी व नगारखाना, पडसाळी, स्माल टेंम्पल, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क, दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री.रोकडोबा मंदिर, श्री.सोमेश्वर मंदिर, श्री.विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम, इतर देवतांच्या मंदिराचा विकास केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT