अभिमानास्पद! शेतकरी कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणीची जिद्द; आसाम रायफल्समध्ये निवड
अभिमानास्पद! शेतकरी कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणीची जिद्द; आसाम रायफल्समध्ये निवड डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

अभिमानास्पद! शेतकरी कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणीची जिद्द; आसाम रायफल्समध्ये निवड

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: जिल्ह्यातील डकला या ग्रामीण भागातील ध्येयवेड्या तरुणीची आसाम रायफल्समध्ये (Assam Rifles) निवड झालीय. प्रशिक्षण संपून आल्यानंतर तीन गावच्या ग्रामस्थांनी मिरवणूक काढून तिचं जंगी स्वागत केले. त्यानंतर तीने आजोबांचा अनोख्या पद्धतीने सॅल्युट करून सन्मान केला. (Proud! The perseverance of a heroic young woman from a farming family; Selection in Assam Rifles)

हे देखील पहा -

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड डकला (SILLOD. PS DAKLA) येथील शेतकरी कुटुंबातील (Farmers Family) ध्येयवेड्या तरुणीची जिद्द आणि अथक मेहनतीच्या बळावर अवघ्या २१ व्या वर्षी आसाम रायफल्समध्ये निवड झाली असून प्रशिक्षण संपताच तालुक्यात आल्यानंतर तिचा तीन गावांतील नागरिकांनी मिरवणूक काढून सत्कार केला. शिल्पा राजू फरकाडे (Shilpa Raju Farkade) असे या मुलीचे नाव आहे. नुकतेच नऊ महिन्यांचे ट्रेनिंग संपवून ती गावात परतली असता डकलासह हळदा, सावरखेडा गावात तिची मिरवणूक काढत गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी शिल्पा भावुक झाली होती.

तिच्या या प्रवासात आजोबा, आजी, आई व तीन मामा यांचे मोठे पाठबळ मिळाल्याचे तिने सांगितले. वडील आईपासून लहानपणीच वेगळे झाले. त्यामुळे आजोबांनी आईसह तिचा सांभाळ केला. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत १ ली ते ४ थी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षणासाठी पैठण (paithan) येथील कन्या विद्यालयात प्रवेश घेतला. मुलींच्या वसतिगृहात राहून १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. येथे शासकीय महिला वसतिगृहात राहून २०१९ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर मुंबई पोलिस दलात (Mumbai Police Force) तिची निवड झाली. परंतु वेगळे क्षेत्र निवडून सैन्य दलात (Indian Army) जाण्याची इच्छा असल्याने तिने मुंबई पोलिस दलात जाणे टाळले.

स्टाफ सिलेक्शन कमिशनची (staff selection commission SSC) परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात तिची आसाम रायफल दलात निवड झाली. रायफल वूमन पदावर निवड झाल्यानंतर नुकतेच ९ महिन्याचे बेसिक ट्रेनिंग नागालँड (Nagaland) येथील सुकोई सेंटर येथे पूर्ण झाले आहे. आता १० दिवसांच्या सुट्टीनंतर याच ठिकाणी ३ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आसाम रायफलच्या शाखेत नियुक्ती होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT