महाराष्ट्र

Kunbi-OBC Protest News : '...तर महाराष्ट्र पेटवू', कुणबी-ओबीसी समाजाचा आजपासून एल्गार

Nagpur News : आजपासून सुरु होणाऱ्या आंदोलनात सर्व पक्षीय कुणबी-ओबीसी नेतेही सहभागी होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या जरांगे पाटील यांच्या मागणी विरोधात आजपासून नागपूरमध्ये कुणबी-ओबीसी संघटना आंदोलनाला सुरुवात करणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी भूमिका या संघटनांची आहे.

आजपासून सुरु होणाऱ्या आंदोलनात सर्व पक्षीय कुणबी-ओबीसी नेतेही सहभागी होणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, असं आश्वासन सरकार कडून मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. (Latest News Update)

जर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

'सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समिती'च्या बॅनरखाली हे आंदोलन होणार आहे. सकाळी 11 वाजता संविधान चौकात आंदोलनाला सुरुवात होईल. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. जातीनुसार जनगणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावं. केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशा मागण्या यातून केल्या जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, सलग दुसऱ्या दिवशी पीएम मोदींचं आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

SCROLL FOR NEXT