Beed Crime Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Beed : 'खोक्या'ला बेड्या ठोका, आज शिरूर बंदची हाक, धसांच्या बालेकिल्ल्यात आक्रोश मोर्चा निघणार, मागण्या कोण कोणत्या?

Satish Bhosale khokya : खोक्या भोसले याला अटक कऱण्यासठी आज शिरूरमध्ये आक्रोस मोर्चा निघणार आहे. शिरूर बंदची हाक देण्यता आली आहे. मोर्चामध्ये ओबीसी नेते हजर राहण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, साम टीव्ही

Beed News : सतीश भोसले ऊर्फ खोक्याला अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर कासार शहर बंदची हाक देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा निघणार असल्याने राज्याचे लक्ष लागले आहे.

बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ व खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली असून पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी होणार आहेत. नऊ वाजता हा आक्रोश मोर्चा निघणार असून पोलीस स्टेशन वर धडकणार आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.

प्रामुख्याने या मागण्या करण्यात आल्या आहेत

सतीश भोसले उर्फ खोक्या व त्याचे सहकारी हरणाची तस्करी करणे व त्यातून भरपूर पैसे कमवणे हा मुख्य व्यवसाय करतात त्याकरिता त्याला वनविभागाचा व राजकीय वरदहस्त असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.

ढाकणे कुटुंबीयाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोकरट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही..

यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावे लागले परंतु त्या ठिकाणीही तक्रार घेतली नाही याबाबतची चौकशी करावी

या सर्व घटना क्रमामध्ये ओबीसी समाजाच्या गरीब कुटुंबावर पोलीस प्रशासनाकडून अन्याय कोणाच्या दबावाखाली झाला याबाबतची चौकशी करावी

आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सह आरोपी करावे

यासह सतीश भोसले यांचे आणखी कुठले अवैध धंदे आहेत या सर्वांचा शोध घ्यावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात येणार आहे.

दरम्यान आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

MNS Deepotsav : मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार शुभारंभ | VIDEO

Leopard: बिबट्यांची संख्या 1200 वर; राज्य सरकार बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार?

SCROLL FOR NEXT