ajit pawar saam tv
महाराष्ट्र

Koynanagar: काेयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवू : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज (साेमवार) सातारा जिल्हा दाै-यावर आले हाेते.

Siddharth Latkar

सातारा : प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची (maharashtra) भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची (koyna dam) निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही. त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली. कोयनानगर (koynanagar) येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणा प्रसंगी मंत्री पवार बोलत होते. (ajit pawar latest marathi news)

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. या निर्मितीमध्ये (कै.) यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) व (कै.) बाळासाहेब देसाई (balasaheb desai) यांचेही मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन (maharashtra government) सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील.

राज्याच्या विकासाला गती

मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाटण (patan) तालुक्यातील काही गावे बाधित झाली आहेत. या बाधित गावांच्या पूनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कोरोना (corona) संकटाच्या काळात शासनाने आरोग्य सूविधा वाढविण्यावर भर दिला होता. राज्याच्या विकासाला गती देण्यात आली असून विकास कामे करीत असताना त्याचा दर्जा उत्तम राखावा असेही पवार यांनी नमूद केले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) म्हणाले कोयना धरण दरवर्षी शंभर टक्के भरते. यातून २ हजार मेगावॉट, वीज निर्मिती केली जाते. याबरोबर सातारा (satara) व सांगली (sangli) भागातील शेतीसाठी पाणी वापरले जाते, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु करण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे नमूद केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील (shrinivas patil), माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT