Prisoners Salary Increase Saam TV
महाराष्ट्र

Prisoners Salary Increase: कैद्यांसाठी आनंदाची बातमी! महागाईमुळे पगारवाढ; तुरुंगात दरमहा कमाई किती?

Prisoners Will Get Salary Increase: राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारचे उद्योग चालवले जातात.

Ruchika Jadhav

Maharashtra News: महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतायत. छोट्याशा पगारात घर चालवताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येतात. अशात या महागाईच्या झळा तुरुंगात काम करणाऱ्या कैद्यांना देखील बसतात. काम करत असलेल्या कैद्यांची गैरसोय आणि अडचण लक्षात घेता या कैद्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

येत्या शनिवारपासून कैद्यांची पगारवाढ होणार आहे. कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांच्या रोजनदारीत ५ ते १० रुपयांची वाढ केली जाणार आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारचे उद्योग चालवले जातात. यात एकून ७ हजार कैदी काम करतायत. ६३०० पुरुष आणि ३०० महिला कैदी यामध्ये आहेत.

तीन वर्षांत दरवाढ

कैद्यांना दर तीन वर्षांमध्ये १० टक्के पगारवाढ देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली आहे.अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्टपासून कारागृहातील सर्व कैद्यांच्या पगारात वाढ करण्याचे आदेश दिलेत.

कैदी कोणती कामे करतात?

सुतारकाम, लोहकाम,चर्मकाम, हातमाग, शिवणकाम, यंत्रमाग, बेकरी, कार वॉशिंग सेंटर, इस्त्रीकाम, मूर्तिकाम ही सर्व कामे कैदी करतात.

कैद्यांना किती पगार मिळतो?

कैद्यांचे रोजचे वेतन ६७ रुपये इतके असते. त्यात आता वाढ करुन हे वेतन ७४ रुपये करण्यात आले आहे. तसेच अर्धकुशल दोषींसाठी दैनंदिन मजुरी ६१ वरून ६७ रुपये आणि अकुशल दोषींसाठी ४८ वरून ५३ रुपये करण्यात आली आहे. खुल्या कारागृहातील कैद्यांचे दैनंदिन उत्पन्न ८५ वरून ९४ रुपये इतके वाढले आहे. या पैशांचा वापर कैदी त्यांच्या स्वत:च्या गरजांसाठी करतात. तसेच वकिलांची फी भरण्यासाठी देखील त्यांना बरीच मदत मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शहादा नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मैदानात

Wakad Tourism: थंडीच्या दिवसात फिरायला जायचंय? वाकडजवळ असलेला हा किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Ravindra Chavan : मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, ट्रक अन् कारची जोरात धडक, २ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT