Supreme Court News Saam Digital
महाराष्ट्र

Supreme Court News: कैद्यांची जात पाहून दिलं जातं काम, सुप्रिम कोर्टातील याचिकेनंतर महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस

Supreme Court News: देशातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची जात पाहून त्यांना काम दिलं जात असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरून न्यायालयाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

Sandeep Gawade

Supreme Court News

देशातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची जात पाहून त्यांना काम दिलं जात असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरून न्यायालयाने केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ राज्य सरकाला नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावताना कैद्यामध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांच्या निवेदनाची दखल घेतली.मुरलीधर यांनी न्यायालयात याचिकवर बाजू मांडताना, ११ राज्यातील अनेक तुरुंगांमध्ये कामाच्या वितरणात आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो. जातीच्याच आधारावत कैद्यांची जागा निश्चित केली जात. त्याप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जात असल्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने यासंबंधी सर्व माहिती एकत्र करण्याच्या सूचना केल्या असून यावर ४ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले, जातीच्या आधारावर भेदभाव केल्याचं ऐकलेलं नाही. फक्त अंडरट्रयल कैदी आणि दोषींना वेगळं केलं जातं. या उत्तर प्रदेश, प. बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, ओडिशा, झारखंड, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT