anil darekar 
महाराष्ट्र

माेळाचा ओढा येथे चार चाकीच्या धडकेत मुख्याध्यापकाचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सातारा : म्हसवे (ता. सातारा) शाळेचे मुख्याध्यापक अनिल दरेकर यांना एका चार चाकी वाहनाने ठाेकर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत असणारे दशरथ फरांदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. principal anil-darekar passes away in road accident near satara

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा अपघात सकाळी सातारा शहरानजीकच्या माेळाचा ओढा येथे झाला. दरेकर हे नेहमीप्रमाणे चालण्याच्या व्यायामासाठी तामजाईनगरातून मुख्य रस्त्यावर आले हाेते. त्यांच्या समवेत असलेल्या दशरथ फरांदे हाेते. या दाेघांना एका वाहनाने ठाेकर दिल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान दरेकर यांच्या अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या तामजाईनगर येथील निवासस्थानी धाव घेतली. यामध्ये शिक्षक वर्गाच माेठ्या संख्येने समावेश हाेता. दरकेर यांच्या निधनाने भिवडी (ता. जावली) गावावर शाेककळा पसरली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT