Suresh Khade Saam Tv
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच पराभूत होणार नाहीत; मंत्री सुरेश खाडे यांचा दावा

मंत्री खाडे आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.

भारत नागणे

पंढरपूर - अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत, कारण ते देशातील लोकांचा आत्मा आहेत असं राजकीय भाकीत मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी केल आहे.

मंत्री खाडे आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी‌ संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच पराभूत होणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले. बारामती जिंकण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. या देशात अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही असे खाडे यांनी म्हंटले.

हे देखील पाहा -

यावरच मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पराभव होऊ शकेल का? असा प्रश्न विचारला असता मंत्री खाडे यांनी काही क्षण स्तब्ध राहत मोदी हे पराभूत होणार नाहीत. ते देशाचा आत्मा आहेत. जनतेचा आत्मा आहेत. त्यामुळे ते पराभूत होणार नाहीत असे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कामगार‌ भवन आणि हाॅस्पिटल उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन ही मंत्री खाडे यांनी दिले. दरम्यान यावेळी सुरेश खाडे यांचा सत्कार देखील करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!₹1500 की ₹3000, कोणत्या महिन्याचा हप्ता झाला जमा? आताच बॅलेन्स करा चेक

H1N1 symptoms: डोळ्यांमध्ये अचानक हे 2 बदल दिसून येतात? सावध व्हा, स्वाइन फ्लूची लक्षणं असू शकतात

हृदय, मेंदू आणि स्किनसाठी दालचिनीचे ‘हे’ अनोखे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Mumbai : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; केस ओढले, चापटा मारल्या अन्... ; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT