PM Narendra Modi  Saam TV
महाराष्ट्र

PM Narendra Modi: रामभूमीतून फुटणार भाजपच्या प्रचाराचा नारळ; नववर्षाच्या सुरूवातीलाच PM मोदींचा नाशिक दौरा

PM Modi Nashik Visit: २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या सोबतच आगामी लोकसभेच्या प्रचाराचा नारळही फुटणार असल्याची माहिती आहे.

अभिजीत सोनावणे

Loksabha Election 2024:

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या यामहोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या सोबतच आगामी लोकसभेच्या प्रचाराचा नारळही फुटणार असल्याची माहिती आहे.

आगामी लोकसभा निवडणूकांचे (Loksabha Election) सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. या निवडणूकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघावर भाजपने (BJP) लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच रामभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून लोकसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे सर्व नेते आणि मंत्री या सभेला हजर राहणार असून या निमित्ताने लोकसभा निवडणूकांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो तसेच विराट सभाही होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या राष्ट्रीय महोत्सवाला १० ते १२ हजार युवकांची उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली जात आहे. त्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले आहे. तसेच येत्या २ ते ३ दिवसात याच्या तयारी संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठकही घेतली जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT