प्रवीण दरेकर Saam TV
महाराष्ट्र

शंभर वेळा अटक करा, अधिवेशनात सरकारचा पर्दाफाश करणारच; दरेकरांचा इशारा

मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, या बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबै बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावल्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सत्र न्यायालयानं दरेकरांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून तोपर्यंत प्रवीण दरेकर यांच्यावरती कठोर कारवाई करु नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. अशातच दरेकरांनी आज सातारचा (Satara) दौरा केला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

आता अधिवेशनामध्ये (Convention) आम्ही सर्व गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दरेकरांनी दिला. ते म्हणाले, मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Mumbai District Central Co-operative Bank) आहे. या बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे.

मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं जात आहे. परंतु असल्या गोष्टींना मी घाबरत नाही एकदा काय 100 वेळा अटक करा आणि आता अधिवेशनामध्ये सर्व गोष्टींचा आम्ही पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack - BP : श्रावणात उपवास करताय? हृदयविकार अन् हाय बीपीच्या रुग्णांनी 'ही' घ्या खबरदारी, नाहीतर जीवाचा धोका वाढेल

Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Urine Infection : पावसाळ्यात रोज 'हे' सुपरफूड खा; बाजारात सहज मिळेल, युरिन इन्फेक्शनपासून वाचाल

SCROLL FOR NEXT