Pratap Sarnaik Google
महाराष्ट्र

Pratap Sarnaik: "हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झालीय", प्रताप सरनाईकांच्या विधानामुळे नवा वाद

Pratap Sarnaik on Hindi: राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या "हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे" या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Bhagyashree Kamble

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या "हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे" या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरनाईक यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, "आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे", त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापलंय. आता हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे, असं वक्तव्य केल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

प्रताप सरनाईकांनी एका कार्यक्रमात म्हटलं की, 'आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी, कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो, पण जेव्हा मिरा-भाईंदरमध्ये जातो तेव्हा हिंदी बोलतो. मराठी आमची मातृभाषा, आमची माय आहे, पण हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे", असं प्रताप सरनाईक म्हणाले.

प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. "त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय लावला, हे मला बघावं लागेल. मराठी ही आमची मायबोली आहे आणि आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मराठीतच बोलतो. प्रताप सरनाईक हे स्वतः मराठी भाषिक आहेत, आणि त्यांच्या मतदारसंघात मराठीचा वापर करतात. मीरा-भाईंदरमध्ये हिंदी भाषिक नागरिकांची संख्या अधिक असल्याने, त्यांनी त्या ठिकाणी हिंदीत संवाद साधला असावा", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

तसेच, महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने दिलाय त्यामुळे या वक्तव्याने आम्ही मराठीच्या विरोधात आहोत असं म्हणण्याचं काही कारण नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Bigg Boss Marathi 6 Winner: 'तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून...'; 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकल्यावर तन्वी कोलते झाली भावूक

Belly Fat: सकाळी या 5 सवयी करा फॉलो, पोटाचा घेर होईल आठवड्यातच कमी

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस, लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी येणार? वाचा सविस्तर

Bhendwal Bhavishyvani 2026: यंदा देशात मुसळधार पाऊस, महापूर येणार; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT