Prashant Koratkar Cars saam tv
महाराष्ट्र

Prashant Koratkar : रोल्स रॉईस, मर्सिडीज, 'कार'नामे; प्रकाश कोरटकरच्या रोल्स रॉईसचं गूढ उलगडलं

Prashant Koratkar Cars : शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या प्रशांत कोरटकरचे अलिशान कारनामे समोर आलेत.. कोरटकर वापरत असलेल्या रॉल्स रॉईस कारचं गूढ साम टीव्हीने उलगडलंय. मात्र ही कार कोणाची आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये..

Bharat Mohalkar

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला गजाआड केलंय.. मात्र त्याच्या अलिशान जीवनाचे कारनामे समोर आलेत. शिवद्रोही प्रशांत कोरटकर वापरत असलेल्या रोल्स रॉईस कारचं अखेर गूढ उलगडलंय.

रोल्स रॉईसचं गूढ 'साम'नं उकललं

- कोरटकरकडे असलेली कार 4700 कोटींची फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवरची

- 2015 मध्ये गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी मोतेवारला अटक

- मोतेवारची 7-8 कोटींच्या रोल्स रॉईसचा लिलाव झालाच नाही

- रोल्स रॉईस विकता येणार नसल्याची CBI, CIDची नोटीस

- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधातून नोटीस मागे घेत गाडीची 2 कोटींना खरेदी

- पुण्यातील रेंज हिल्स परिसरात गाडी चालवतानाचा कोरटकरने काढला व्हिडीओ

- रोल्स रॉईस सापडत नसल्याचा सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा

सीआयडीला सापडत नसलेली WB - 02 - AB 123 ही रोल्स रॉईस कार पिंपरीतील तुषार कलाटेंची असल्याचं समोर आलंय...

- तुषार कलाटे हे पिंपरी चिंचवडच्या ताथवडे गावचे रहिवासी

- कलाटे पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक

- तुषार कलाटेंचे वडील आत्माराम कलाटे पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष

- 2019 मध्ये भोर-मुळशी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली

- तुषार कलाटे हे हेलिकॉप्टर खरेदीमुळे चर्चेत आले होते

मात्र रोल्स रॉईस कारमध्ये तुषार कलाटेने होणारे आरोप फेटाळून लावलेत. दुसरीकडे प्रशांत कोरटकरने फरार होण्यासाठी वापरलेली SUV कार कोल्हापूर पोलिसांनी जप्त केली.. तर ही कार धीरज चौधरींची असल्याचं उघड झालंय...मात्र ही कार मित्र प्रशिक पडवेकरने नेल्याचा दावा चौधरींनी केलाय.. शिवद्रोही प्रकाश कोरटकर तुरुंगात असल्याने चौकशीत त्याचे आणखी किती कारनामे समोर येणार? आणि पोलीस चौकशीनंतर कोरटकरचा पाय आणखी खोलात जाणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT